इटली...it's not important..!!!

नुकताच इटलीला एका conference साठी जायचा योग आला..मी, माझे दोन सहकारी आणि एक प्रोफ़ेसर असे जायचे ठरले..conference चा पहिला दिवस पार पडला...दुसऱ्या दिवसाची सुरवात व्हायला वेळ लागत होता..पहिल्या सत्रात ज्यांची presentations होती ते लोक तयार होते पण बाकीचे लोक जमा व्हायला वेळ लागत होता..शेवटी एकदाचे सर्व लोक आलेत असे गृहीत धरून सत्राला सुरुवात झाली..पहिल्या सत्राची सूत्रधार असणारी एक "शास्त्रद्न्य" महिला, सत्राची सुरुवात करताना म्हणाली.."आपल्याला थोडासा उशीर झाला आहे...पण ते फार महत्वाच नाहीये...." सत्राची सुरुवात ९ ऐवजी ९.३० ला झाली होती.....
३-४ दिवसानी पिसा ला जायचे ठरले होते....रस्त्याकडेच्या बाजारात माझ्या सहकाऱ्यानी एक goggle पसंत केला व विकत घ्यायच्या विचारत तो होता...त्या विक्रेत्याच्या मागेच एक पाटी होती.."इथे मिळणाऱ्या वस्तू कायदेशीर रित्या विकल्या जात नाहीत तरी प्रवाशानी नोंद घ्यावी." मी माझ्या सहकाऱ्याच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली..आणि तोही ती पाटी नीट वाचू लागला...त्याला ती पाटी वाचताना पाहून दुकानदार म्हणाला " त्या पाटीकड़े लक्ष देऊ नका..ते काही महत्वाच नाही..आम्ही रोज ह्या गोष्टी विकतो.."
अजून १-२ दिवसानी आम्ही इटलीची राजधानी रोम मधे आलो...इटली मधील लोकांचे इंग्लिश भाषेशी वाकडे आहे हे माहित होते पण तरी तोडके मोडके इंग्लिश बोलून आम्ही कसे बसे एकदाचे होटेल शोधून काढले..फार दिवस हातात नसल्याने जितका वेळ मिळेल तेवढ्यात रोम फिरून घ्यायचे हे आधीच ठरले होते...ब्यागा खोली मधे ठेवून फिरण्यासाठी आम्ही बाहेर पडलो...होटेल वाल्याला विचारल "Colloseum च्या आत जायला किती तिकिट असत?" तो म्हणला," आत कशाला जाता साहेब..काही फार महत्वाच नाहीये आत मधे..त्या पेक्षा तो वेळ दुसऱ्या कशासाठी तरी वापरा..."
हे सगळ ऐकल्यावर आणि पाहिल्यावर वाटत...मग इटली मधे आहे काय महत्वाच? की Nothing is Important ????

Comments

  1. सुंदर आणि मनोरंजक लेख! इटलीबद्दल नवी आणि उद्बोधक माहिती मिळाली. तुला आपल्या देशाची आठवण झाली असेल :-)
    ब्लॉगसाठी शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. हो ना.. इटली मधे बऱ्याच गोष्टी भारतासारख्या वाटल्या....

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts