काही गमती जमती...

गेल्या ८-९ महिन्यात अनुभवलेल्या काही गमती जमती...इतर यूरोपीयन देशात सुधा ह्यातील काही अनुभवायला मिळत असतीलही पण हे माझे  नेदरलंड्स मधले अनुभव आहेत.

१) स्नेल म्हणजे वेगवान (स्नेल = गोगल गायीशी काहीही संबंध नाही)

२) कुठेही बाजारात गेलात तर अनुभवाल अस एक संभाषण..खरेदी झाल्यावर पैसे देताना..
    ग्राहक: (पैसे देऊन) आल्स्तुब्लिफ्त (कृपया)
    दुकानदार : दांक यू वेल (धन्यवाद)
    दुकानदार : (सुटे पैसे किंवा  मोड परत करताना) आल्स्तुब्लिफ्त
    ग्राहक:  दांक यू वेल

३) पैसे देताना खरेदी केलेले जिन्नस ठेवायला काउंटर वरून पिशवी घेतलीत तर त्याचे ज्यादा पैसे पडतील.

४) रेल्वे ९ ला म्हणजे ९ लाच सुटेल...पण बस, मेट्रो किंवा ट्रामची वेळ  मागे-पुढे होऊ शकते..त्याचा अंदाज़ ठेवून  घरातून  निघा. 

५) नेदरलंड्सच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सायकलने जाऊ शकता..(कारण रेल्वे मधून सायकल नेता येते, मात्र ज्यादा तिकिट पडेल.)

६) केस कापायला गेल्यावर न्हाव्याच्या दुकानातला वेळ वाचवायचा असेल तर आधीच इ-मेल किंवा   फ़ोन करून न्हाव्याची appointment घेउन ठेवा. ठरलेल्या वेळी फक्त तुमचेच केस कापले जातील. हवी असेल तर वेळ घालवायला एक कप कॉफी देखील मिळेल.

७) कुठेही सापडू शकेल असा खाण्याचा पदार्थ- पातात मेत मायोनेज़- बटाट्याचे काप (फ्राइज़)आणि मायोनेज़...जिथे जाल तिथे 'पातात'च  दुकान शोधायची जबाबदारी तुमची!

८) पैशाची नोट फाटली असेल तरी कुठेही चालते..मात्र नोट जर खोटी असेल तर मात्र अजिबात घेतली जाणार नाही..पुढचे परिणाम माहित नाहीत.

९) रस्त्याच्या एका बाजूच्या घरांचे क्रमांक सम संख्या असतात (उदा. २,४,६...)  तर दुसऱ्या बाजूच्या घरांचे क्रमांक विषम संख्या (उदा.१,३,५...)

१०) सायकलच्या चाकात हवा भरणे हा कार्यक्रम काही दुकानात मोफत करू दिल जातो.

११) नेदरलंड्स हे समुद्र सपाटीपासून खाली आहे. इथे प्रत्येकाला पोहायला यायलाच हवे. त्यासाठी प्रत्येकाला लहानपणीच पोहोणे शिकणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाला एक डिप्लोमा मिळवावा लागतो.

१२) प्रत्येक लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये निदान १-२ डब्यांमध्ये तरी "सायलेंट" झोन असतो. त्या झोन मध्ये बसलात तर केवळ पेपर वाचणे, लॅपटॉपवर काम करणे किंवा फार फार तर हेडफोन लावून गाणी ऐकणे एवढंच तुम्ही करू शकता. बाकी बडबड धनगड धिंगा चालणार नाही. लोक येऊन तुम्हाला उठवू शकतात.

१३) मोठमोठाली ब्रँडेड दुकानं किंवा सुपरमार्केट्स सोडली तर बाकी दुकानं रोज संध्याकाळी ४. ३० पासून बंद व्हायला सुरुवात होते. प्रत्येक शहरात आठवड्यातल्या एका ठराविक दिवशीच ती उशिरापर्यंत चालू असतात. 

१४) एखाद्या 'प्रोफेसर' सारख्या हुद्द्यावर असलेल्या माणसाला जास्तीत जास्त ५२% आयकर भरावा लागतो!

Comments

  1. nice!!

    ekach pharak aahe: 'Snail' aaNI 'schnell' (nidaan German madhye taree) uchchaaraat bharpoor pharak aahe... Dutch madhye??

    ReplyDelete
  2. उच्चार डच मधे सुधा वेगला आहे स्ने~ लांबवत नाहीत...
    आणि बाकीच्या गोष्टी पण इतर यूरोपियन देशात दिसतात का?

    ReplyDelete
  3. Hey, I like your article...; But ek vicharavasa vatata related point no 7.... sapadavayachi ki shodhayachi?


    Sudeep

    ReplyDelete
  4. @ Sudeep: शोधायची...correction done !! ;)

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts