डचिस्तानमधली पाकिस्तानी मावशी

आमस्तरदाम मधल्या Van Woustraat नावाच्या रस्त्यावरून कधी गेलात तर तुम्हाला असंख्य दुकान दिसतील..प्रसिद्ध असा "अल्बर्ट कौप बाजार" पण इथल्याच एका गल्लीत सुरु होतो...काही शिम्पी दिसतील... सायकल दुरुस्तीची दुकान दिसतील ... आणि अशीच छोटी छोटी बरीच दुकान दिसतील; रस्त्यावरच ह्या दुकानांचे स्टॉल्स दिसतील...भाज्या, फळ, बाहेरच टोपल्यांमधे मांडून ठेवलेली दिसतील... एक अंकारावरून आलेल्या माणसाच आहे, एक दक्षिण अमेरिकेहून आलेल्या माणसाच आहे... असो..तर अश्या ह्या दुकानां मधेच एक दुकान आहे - "खेरा एशियन फ़ूड स्टोर"...माझ्या एका मित्रानी मला त्या दुकानाबद्दल सांगीतल..म्हणून आमस्तरदाममधे आल्या आल्या मी मित्राबरोबर तिकडे एकदा हजेरी लावून आलो....
दुकानाच्याजवळ जातच होतो तेवढ्यात एक हाक ऐकू आली.... "ओय उपदेशं.....वो आलू का बॉक्स किधर रखा तूने ??" ती हाक ऐकून एक साधारण २५-३० वर्षाची मुलगी लगबगीने दुकानात गेली...दारातली रांग आधीच निमुळत्या असलेल्या दुकानाच्या दाराला अजूनच लहान करत होती... मीही त्या रांगेत उभा राहिलो...२ मिनिटानी समजल की ती रांग आत जाण्यासाठी नसून  खरेदी केलेल्या जिन्नसांचे पैसे देण्यासाठी होती...पारशी,शिख,भारतीय आणि चक्क काही डच लोक सुधा त्या रांगेत उभे होते...
थोडासा बाजूला होउन दारातून आत शिरायचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात पुन्हा आवाज ऐकू आला..."उपदेश..सबको थोडा बाजू हटाना..उस छोकरे को अन्दर आने दे"...मला कुठून आवाज आला काही कळलच नाही..मग नीट बघितल्यावर दिसल की रांगेच्या तोंडाशी एक काउंटर होता..एकावेळी एकाच ग्राहकाचा हिशोब करायचा अस त्या काउंटरच्या अकरावारून कळत होत...आणि काउंटर च्या पलिकडे एक साधारण पन्नाशीतली बाई होती..अजून थोडासा आत मधे गेल्यावर ती काउंटरमागची बाई पूर्ण दिसली...अंगात स्वेटर, केस अम्बाडयासारखे मागे बांधलेले, डोळ्यावर चश्मा..आणि चेहऱ्यावर एक विशिष्ट आशियाई भाव....हात भराभर हिशोब करून पावत्या देण्यात गुंतलेले...आणि तोंडानी डच, पंजाबी भाषा...मला बघून ती बाई म्हणली "नमस्ते बेटा....!" तिला नमस्ते करून..मी वळलो..आणि बघतो तर काय...दुकान म्हणजे नुसती बजबजपुरी होती... इकडे भाज्या..तिकडे फळ...टोकाला तयार पदार्थांची पाकिट...हळदीरामची शेव..बूंदी..नूडल्स...आणि इतर बराच काही..उजवीकडे लोणची, सूप्स, पलिकडे पापड़..तयार पोळ्या...मधेच एक छोटासा फ्रीज़र..त्यामधे तयार पराठे...चिरलेल्या भाज्यांची पाकिट...अलीकडे तेल, तूप, चहा, कॉफी...आणि बरच काही...काउंटर च्या मागे...उदबत्त्या,टूथपेस्ट आणि इतर बारीक़ सारिक सामान....आणि ह्या सगळ्यामधे  बसलेली ती "खेरा मावशी" काउंटर वरून तिची मुलगी उपदेश आणि इतर २ काम करणाऱ्या मुलांना आदेश देत होती...माझी खरेदी झाल्यावर पैसे देण्यासाठी मी काउंटर समोर आलो..मी नवीन आहे हे खेरामव्शिने लगेच ओळखल..म्हणली "बेटाजी..जो चाहिए वो लेते जाओ..अपनाही दुकान है...". वास्तविक "अपनाही दुकान" म्हणल्यावर मी पैसे न देण सोयीस्कर होत..पण शेवटी पैसे देऊन खेरा मावशीचा निरोप घेउन बाहेर पडलो...
तेंव्हा पासून आज पर्यन्त दर शनिवारी खेरा मावशीकडे एक चक्कर होतेच...आता ती ही मला चांगलीच ओळखते..पण तिच्यात मात्र काडीचाही फरक मला जाणवला नाहीये..गमतीची गोष्ट ही की ऋतू बदलले तरी खेरा मावशीच्या अंगातला स्वेटर काही जात नाही.... एकदा मी असाच दुकानात गेलो असताना खेरा मावशी भजी खात होती...मी हसून नमस्ते केल्यावर मला म्हणली" खाओगे..?? मैंने बनायीं है अभी अभी..." बरेच दिवसानी समोर गरमागरम भजी दिसल्यावर "नको" म्हणलो असतो तर नंतर नुसतच तिला खाताना बघत बसाव लागल असत..माझा हा विचार चालू असतानाच एक छोटी प्लास्टिक ची पिशवी काढून ६-७ भजी त्यात भरून माझ्या समोर ती पिशवी ठेवून ती मोकळी झाली...खर तर आनंदानी उडी मारायला हावी होती पण मी मोह आवरला..सामान खरेदी करून, भजी बरोबर घेउन निघालो तर तेवढ्यात मागुन आवाज आला.."किसीको मत बताना क खेरा आंटी ने मुझे भजी खिलाई नहीं तो सब आ जायेंगे..." मी मन हलवून तिथून बाहेर पडलो...
दिवाळी मधे "कल दोपहर आना ..ताज़ी ताज़ी मिठाई आने वाली है..." सांगणारी खेरा मावशी हल्ली मी काय घेणार ते मी दुकानात शिरल्या शिरल्याच ओळखते..एकदा तर मीच तिला काही घेण्याआधीच पावती करून ठेवायला सांगितली होती..एकदा तिच्या ऐवजी तिची मुलगी काउंटर होती..मी तिला विचारल "आंटी नहीं है आज?" तेवढ्यात बाजूला असलेल्या जिन्यावरून आवाज आला.."हूँ..हूँ..मैं कहाँ जाऊंगी?? जरा दांतमे दर्द है बेटा...बाकी कुछ नहीं"..थोडीशी गंमतच वाटली...फार वेळ न घालवता मी बाहेर पडलो.. 
मागच्याच आठवड्यात खेरा मावशी जरा शांत होती.... मी विचारल "क्यों आंटी ? बीमार हो? आज अच्छी धूप खिली है..थोड़ी गरमीभी है..आप शांत है और स्वेटर भी पहने है???" उत्तर लगेच हजर होत....
"लोगोंको मैं चुप बैठू ये बात हजम नहीं होती है शायद.....कुछ नहीं हुआ है मुझे.......ऐसेही चुप बैठी हूँ....अगर कोई और पूछता है अब तो पक्का कुछ होने वाला है.."  मी काय बोलणार...सामान घेउन बाहेर पडलो.....
पण खेरा मावशी मात्र हसत होती.....
अशी ही पाकिस्तानी मावशी एका हिन्दुस्तान्याला आजपर्यंत खाऊ घालते आहे ... ;)

Comments

Post a Comment

Popular Posts