वेळाच महत्त्व: जर्मनी मधला एक अनुभव



डिसेम्बर २००९ मधली गोष्ट...मजेशीर असली तरी त्यावेळी वेळाच खर महत्त्व आम्हाला समजल अस म्हणायला हरकत नाही...मी आणि माझा मित्र जर्मनी मधे होतो..ख्रिसमसची सुट्टी सुरु होती म्हणून जर्मनी मधली काही गावे फिरायचा प्लान होता..बर्लिन, म्युनिक फिरून झाल्यावर आम्ही फुसेनला येउन पोहोचलो...
फुसेन हे जर्मनी व स्वित्झर्लंड च्या सीमेवर असणार एक छोटस गाव आहे... आल्प्सच्या पर्वतरांगा ह्या गावाला अजून शोभा आणतात...हिवाळ्याचे दिवस होते..सगळीकडे बर्फ दिसत होत..फुसेन मधे दोन अतिशय जुने राजवाडे आहेत. ते बघायला पर्यटकांची खूप गर्दी असते.. नॉयश्वांस्टाइन आणि होहेंगश्वांगाउ अशी त्या राजवाडयाची नावं.. दोन्ही राजवाड़े डोंगरावर आहेत...तरीही डोंगर चढून ते राजवाडे पहाण्यातली  मजा काही औरच आहे...
आणि अगदीच नसेल चढत जायच तर घोडागाडी आहेच!
ते दोन्ही राजवाडे पाहून आम्ही अक्षरशः थकक झालो होतो... होहेंगश्वांगाउमधल्या प्रत्येक खोलीतील कपाटे, टेबलं, खुर्च्या हे वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडापासून बनले आहे हे ऐकून खरच त्या राजांच्या श्रीमंतीची कल्पना आली.. पण कारागीरांनी अथक प्रयत्न करून देखील एका राजाला त्याच्या नवीन राजवाडयात - नॉयश्वांस्टाइन - रहाता आलं नाही हे ऐकून वाईट वाटल कारण नॉयश्वांस्टाइन बांधून होण्याआधीच तो राजा वारला... त्या कारागीरांना तर त्यावेळीच वेळाच महत्त्व कळल असेल म्हणा.. आमची खरी गम्मत तर नंतर झाली...
दोन्ही राजवाडे पाहून आम्ही फुसेनच्या स्टेशनवर येउन थांबलो... गाडी यायला अजून दीड तास होता... युरोपातल्या वक्तशीरपणाबद्दल ऐकून होतोच..म्हणून गाड्या येण्याच्या आणि सुटण्याच्या वेळा आम्ही मुद्दाम बघत होतो...आणि आम्ही जे अनुभवल ते खरोखरच त्या वक्तशीरपणाला सलाम करण्याच्या लायकीच होत....
आम्ही फुसेन वरून बाडन-बाडन कडे जाणाऱ्या गाडीची वाट बघत होतो... गाडी यायला साधारण २ मिनिटे होती...तरीही गाडी लांबवर सुधा दिसत नव्हती.. आणि जसा काटा हलला आणि एक मिनिट उरलं तशी ती गाडी दूरवर दिसायला लागली... आणि त्याहीपेक्षा त्या एका मिनिटात तीच गाडी स्टेशनवर येउन थांबली देखील.....!!!
आम्ही गाडीत बसलो आणि वेळात आली म्हणजे निश्चित वेळात पोहोचणार हे निश्चित करून चाललो होतो..पुढची गाडी पकडायला मधे ५ मिनिटे वेळ होता.... म्हणून निर्धास्त होतो...
गाडी  सुटली... स्टेशना मागून स्टेशन जात होती.. आणि आम्ही गप्पा मारत फुसेन बद्दल चर्चा करत  होतो... अचानक गाडी थांबली... अंधार झाला होता... आणि कुठलही स्टेशन आसपास दिसत नव्ह्त.. गाडी नेमकी कशासाठी थांबली काहीच कळत नव्हतं.. शेवटी ५ मिनिटानी गाडी सुटली तेंव्हा कळल की वाटेत सिग्नल लागला होता... पण तीच ५ मिनिट नंतर महाग पडतील हे वाटल देखील नाही... जसजसा वेळ जाऊ लागला तसतसा आमचा धीर सुटू लागला... आमच्या सारखेच डब्यातले इतर काही प्रवासी काळजीत पडले.. पुढच्या स्टेशन वरून १० मिनिटात गाडी पकडायची होती... पण हीच गाडी आता कधी पोहोचणार ह्याची चिंता होती.. काही प्रवाश्यांनी चालकाला सांगण्याचा प्रयत्न केला... चलाकानेही गाडीचा वेग वाढवला पण त्याला देखील काही मर्यादा होत्या... शेवटी गाडी पोहोचल्या पोहोचल्या अक्षरशः गाडीतून उड्या मारून जायच आम्ही ठरवल... आणि तयार झालो... आधीच १ मिनिट  उशीर झाला होता.. गाडी स्टेशनात शिरली... आम्ही ब्यागां सकट दारापाशी जाऊन थांबलो...
गाडी platformला लागतच होती... पण अजून पुरती थांबली नव्हती.. आम्ही दरवाज्याच्या खिडकीतून बाहेर पहिलं आणि आमची गाडी आमच्या समोर निघून गेली...
        

Comments

  1. mi kadhi toh anubhav visru shakat nahi raja :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts