आमस्तरदामची पहिली झलक आणि नवीन प्रवास

"I told you the train leaves from Platform 1-2!!" ...पहिल्याच भेटीत ताडकन इंग्लिश मधे उत्तर देऊन ती काउंटरवरची बाई काहीतरी कामासाठी  दुसरीकडे गेली..आमस्तरदामच्या स्किफोल एअरपोर्ट वरची कहाणी....मी रेल्वेच टिकेट घेउन platform १-२ ची एकदा फेरी मारून आलो होतो..तिकडे एकानी सांगितलं गाड़ी platform ३ वरून सुटते म्हणुन पुन्हा त्या खिड़की पर्यन्त याव लागल आणि हे उत्तर मिळालं..हो.. आमस्तरदाम मधल्या नव्या आयुष्याची सुरवात झाली होती....पुन्हा एकदा ३ ब्यागा घेउन मी जमिनिखालच्या platform वर गेलो..त्या डच बाईनी सांगितल्याप्रमाणे खरच आमस्तरदाम सेंट्रल ची गाड़ी platform १-२ वर आली. ब्यागा सावरत चढलो आणि दाराजवळच मिळालेल्या जागेवर डेरा टाकला..
युरोपात शिष्यवृत्ति घेउन शिकायला जायच हे स्वप्न (कधीही न पाहिलेल..पण इच्छीलेल ...) पूर्ण झाल होत...Erasmus Mundus ची शिष्यवृत्ति घेउन परदेशात शिकायला येणाऱ्या अभ्यंकरांपैकी मी दुसरा..आणि दोघा अभ्यंकरांमधे वयानेही मोठा..पण तरी परदेशचा अनुभव मुळीच नसलेला मी..सर्व तयारीनिशि मुंबईच्या छत्रपति शिवाजी एअरपोर्टवरून निघणार होतो.. एअरपोर्टच्या आतपर्यंत कधी गेलो नसल्याने आत काय चालत कुणाला ठाउक  होत.. ब्यागेच वजन ३ किलो जास्त झाल म्हणल्यावर काही सामान कमी केल आणि मग ब्याग विमान वाल्यांकड़े सुपूर्त केली..बोर्डिंग पास घेउन झाल्यावर २ वेळा अंगातले कपडे तेवढे वाचवून बाकी सगळ तपासणी साठी सिक्यूरिटी गार्ड्स कड़े दिल..त्यांची खात्री पटल्यावर पुन्हा सगळा वेष सावरून बोर्डिंग ची वाट बघत बसलो...थोडीशी धाकधुक होती..कारण पुण्याच्या बाहेर फार वेळ कधी न राहिलेला मी अगदी ३ वर्ष परदेशात रहायला निघालो होतो..अजून एकदा तपासणी झाल्यावर शेवटी एकदाचा विमानात बसलो.... विमानात बसण्याचीही पहिलीच वेळ होती..सीट बेल्ट्स लवून तयार झालो आणि विमानानी आकाशात झेप घेतली...
१५-२० मिनिटात गाड़ी आमस्तरदाम सेंट्रलला पोहोचली. सर्व सामान बाहेर काढून एकदा स्टेशनवर नजर टाकली..ना गर्दीतून रास्ता काढणारे हमाल होते ना तो नेहमीचा मुंबई-पुणे स्टेशन वरचा गोंधळ होता.....उलट गर्दी असून सुधा शिस्त सांभाळता येते हे तिथेच पहिल्यांदा समजल.... उंच कमान..एक जुनी यूरोपियन ईमारत..स्वच्छ रूळ..स्वच्छ platforms ...एस्केलेटर्स..धावत-पळत ट्रेन पकड़णारी माणसं...सगळ बघितल असल तरी नवीन वाटत होत...ब्यागा घेउन खालती आल्यावर प्रोफेसरना फ़ोन करायसाठी फ़ोन बूथ शोधू लागलो..तर एक अजब गोष्ट लक्षात आली..ती म्हणजे चक्क एकही फ़ोन बूथ दिसत नव्हत..काय करायच ह्या विचारत असतानाच अजून एक विलक्षण अनुभव आला..स्टेशनच्या बाहेरच एक माणूस..गटार साफ करणारा असावा..म्हणला माझ्या फ़ोन वरून प्रयत्न कर...!!!  थक्क होउन मी त्याच्या कडून फ़ोन घेतला खरा पण काम काही झाले नाही..मग पुन्हा एकदा जमिनिखालून धावणाऱ्या मेट्रो मधून Weesperplein नावाच्या स्टेशन पाशी आलो आणि DeKey नावाच्या उच्चभ्रू दिसणाऱ्या एका घरे देणाऱ्या कंपनीकडून घराच्या किल्ल्या घेतल्या...किल्ल्या घेई पर्यंत एकदा ट्राम मधून उलट दिशेनी यात्रा पण करून झाली होती...
एवढ सगळ होत असताना आमस्तरदामची ओळख होऊ लागली होती...कालव्यांच शहर.. सायकलींच शहर...जिकडे तिकडे सायकलीच सायकली...आखीव रस्ते..रेखीव कालवे.. कोणीतरी ओळीने लावावी तशी एका ओळीत असणारी रस्त्याकडेची झाडं.. सगळ मांडून ठेवल्यासारख वाटत होत.. पाउस नुकताच शिंपडून गेला होता..सगळीकड़े हिरवगार होतं....अशातच मी इकडून तिकडे अक्षरशः भटकत होतो...शेवटी प्रोफेसराना भेटून पुन्हा एक-दोनदा ब्यागा वर खाली करून मेट्रो मधून घरी येउन पोहोचलो..
वेगवेगळ्या वाहनांमधून प्रवास करून झाल्यावर लक्षात आलं की खरा प्रवास तर आता सुरु झालाय...

Comments

  1. hey Boy you are a good writer too.....keep it up....Baba

    ReplyDelete
  2. चला, काही युरोपिअन आपल्या सारखेच आहेत तर! अजून लेख येऊदेत डच लोकांवर.

    ReplyDelete
  3. are khupach masta......... keep it up......

    ReplyDelete
  4. वा ! सुंदर..तुझे अनुभव वाचायला मिळाले ...छान वाटले...नवीन ब्लॉग बद्दल शुभेछा!

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts