अशीही एक स्मशान यात्रा ...
स्मशान यात्रा म्हटल्यावर काय विषय निवडला आहे मी अस कदाचित वाटेल ... पण ही स्मशान यात्रा आपल्याकडे जशी असते तशी नव्हती म्हणून लिहावस वाटल.
आज सकाळची गोष्ट. मी माझ्या एका कामासाठी ऑफिस मधून थोडा वेळ बाहेर पडलो होतो. चालत निघालो होतो. तोच वाटेत गर्दी दिसली. बघितल तर पुरुष आणि बायका हातात फुलं धरून उभी होती. पाउस रिपरिपत होता. तरी देखील लोक छत्र्या घेउन उभे होते. काय चालू आहे कळत नव्हत. तेवढ्यात बाजूला उभी असलेली एक क्रेन सदृश गाडी दिसली. त्या क्रेनची वरच्या बाजूला असलेली सिट एका खिडकीतून आत गेली होती. सारा माहोल पाहून वाटत होत की कोण तरी वारल असणार! पण बाजूनेच वहात असलेल्या कालव्यामधे असलेल्या बोटींमधे देखील काही लोक फुले घेउन बसले होते.
मी न थांबता पुढे चालू लागलो. तेवढ्यात विचार आला की ती क्रेन नक्की काय करत असेल. तेंव्हा डोक्यात आल की इथल्या इमारतींमधले जीने बऱ्यापैकी निमूळते असतात म्हणून कदाचित प्रेत बाहेर काढताना अडचणी येत असतील म्हणून कदाचित त्या क्रेन च्या सहाय्याने प्रेत बाहेर काढत असतील की काय? खर-खोट देव जाणे.
माझ काम आटोपून मी परत येत होतो तेंव्हा ती गर्दी थोड़ी पांगली होती. पाउस पडतच होता. पण त्या बोटी मात्र आता रांगेने निघत होत्या. त्यातल्या एका बोटीमधे कॉफिन होती. त्यावर फुले ठेवली होती. काही माणसे सूट घालून त्या कॉफिन च्या भोवती बसली होती. बाकीची माणसे इतर बोटींमधून निघाली होती. रस्त्यानी येणारी-जाणारी माणसे कालव्याच्या बाजूला उभे राहून प्रार्थना करत होती. काही नुसतीच बघत उभी होती. काही अक्षरशः रडत होती.
अशी ही कालव्यातून जाणारी स्मशान यात्रा! बघायला मिळेल कुठे?
Afterall, it is the final departure...May it's on shoulder of 4 persons , in a hearse, may by as you described here...
ReplyDelete