हाल - ए - मराठी!

माझ्या आजोबांच्या मित्रानी एक दिवस आम्हाला एक कागद आणून दिला. उघडून पाहिलं तर त्यात ऐकिवात आलेल्या किंवा वाचनात आलेल्या किंवा विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या असंख्य मराठीतल्या चुका होत्या. त्या वाचल्यावर आमची हसून हसून पुरेवाट झाली. त्याच खाली दिल्या आहेत. काही मजेशीर वाक्य आहेत, काही विनोदी व्याख्या तर काही विनोदी परिच्छेद आहेत. बरोबर शब्द काय हवा हे काही ठिकाणी कंसात ठळक अक्षरात दिले आहे. ह्या चुकांमधून कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही. केवळ विनोद म्हणून वाचून सोडून द्याव्यात. अर्थात ह्या चुका आपल्या हातून होवू  नयेत ही काळजी घ्या!


दमयंती नळाच्या मनात फारच कोंबली  होती….
गणित म्हणजे रँग्लर परांजपे ह्यांच्या हातचा मैला…. 
सतीचे  वाण घेणे म्हणजे जन्माच्या सहाव्या  दिवशी नशिबी  काय ते लिहिणे….
ह्या पाचशे वस्तीच्या गावाला दोन वेश्या  होत्या व त्या मोडकळीस आल्या होत्या…. 
पावसाने घरे सुवाच्च  धून  काढली…
माझ्या अंगात वीरस्त्री  संचारली….
दुष्यंताने शकुंतलेचा शिकार केला…
शकुंतलेच्या अंगावर रोमान्स अुटले…
त्याच्या अंगावर शहरे अुभी राहिली … 
राघोबा पत्नीच्या कलहाने वागत असे…
आनंदीबाई मच्छरी  होती…
कौशल्याचा  राम वनात गेला…
किस्नाने भीमास खून करून बोलाविले…
साने गुरुजींनी सात दिवस अुपहास केला…
ती सुकी आहे…
पूर्वी स्त्रियांचे केश ओपन होत असे…
लेखकाचा दृष्टीकोन अुधार आहे…
वाअीट विचारांचे निरशन करावे…
वामनाने बळीला आपल्या पायाने पात्तळात दडपले…
रस्ते मानसांनी व वहाणांनी भरून गेले होते…
शहरात कुतरीमता फार…
ही बातमी लगेच प्रसूत झाली…
डॉक्टर केतकरांना मधुमिय्या  होता…
भाअूसाहेब पेशवांची कबर खचली…
काणेकरांचा नरम विनोद मला आवडतो…
त्या क्रियापदाचा समंध  कर्त्याशी आहे…
मंजुळा वृच्छ लंख [उच्छृंकल] होती. तिने कवीला आपल्या अडगळ  [खेडवळ] भाषेत सांगितले….
वा. म. जोशी यांनी विषुववृत्त  [विष्ववृत्त] मासिक सुरु केले…
माटे यांनी आपल्या नेहमीच्या हातोडी  [हातोटी] ने हे सिद्ध केले आहे…
टिळक हे जहाली [जहाल] पक्षाचे तर रानडे हे मावळी [मवाळ] पक्षाचे पुढारी होते…
केतकरांत प्रचंड आत्मविषवास  होता…
अिंग्रज सहचारी शोधून काढून तिच्याबरोबर संगनमत करतो व रमबाण  होतो…
कवीची प्रतिभा मोठी दांडकी आहे…
देशाची स्थिती पाहून चिपळूणकरांचे अगदी हृदयंगम  झाले…
शकुंतलेने दुष्यंताचे चांगले प्रतिपादन केले…
आपण अेकाच रणभूमीचे सुपुत्र आहोत… 
निबंध लेखकाची भाषा वरदहस्त [भारदस्त] आहे…. 
क्रिकेट हा मला अगदी मित्रवर्य  आहे…
जिल्ह्याच्या ये. वू. [A. O.] सायबाला काळजीपूर्वक नमस्कार. 
समाजाचे आपण द्योते हे प्रदरशीत… (?) 
फडक्यांची शैली अत्यंत अनुष्ठीत व समुच्चयकारी असल्यामुळे लेख वाचताना वाचकाची प्रलय लागते… 
मी आल्या गेल्या पाहुण्यांची मशागत करण्यात गर्क असल्यामुळे माझ्या हे ध्यानात आले नाही. 
निरदय फोसदार आपली भपकेबाज छाती काढून… 
रँग्लर परांजपे यांच्या मिशा बाणेदार… 
शकुंतलेची घडण फारच चांगली… 
लोकमान्य टिळक हे मोठे कामचलाअू  होते… 
डॉक्टर केतकर व सरदेसाअी यांचा व्यास  फारच मोठा…
शकुंतलेने दुष्यंत हा गंधर्वाचा नवरा केला…

          
दुरस्था (दुरवस्था?) = दूरचा रस्ता
धरित्रीकांत = धरित्रीचा आकांत
रूपयौवन चातुर्यभारिता = रूपयौवनाचे चातुर्याने केलेले भरीत
रुचिप्रद = अुत्प्रेक्षा समास
गृहस्थ = अुपद्रव तत्पुरुष 
कृदंताचे  उदाहरण = नळाने सोडून दिल्यामुळे हंस अगदी कृदंत होअून गेला.
                               (कृदंत = कुरतडणारा; अुदाहरण = उंदीर) 
                               ['कृदंत' चा खरा अर्थ: धातूला प्रत्यय जोडून झालेल्या धातुसाधित शब्दास (कृत् + अंत)    
                               म्हणतात.]
शहाजणे [मूळ अर्थ : वाद्य] = शहाजीने किंवा  सहाजण (पंच)
बोरघोडी = मोठे गाढव किंवा बोराप्रमाणे टोचून बोलणारी घोडीसारखी मुलगी. 
कौटिल्य = दशरथाची बायको
वूल = एक जनावर 
संजय = गांधीजींचे मरणस्थळ
गौतम बुध्द = हे दगडाचे बनलेले असून पांडव लेण्यात ठेवलेले आहेत

ताजमहाल = ही शहाजहान बादशहाच्या बायकोची स्मरणशक्ती

फुफ्फुस = हे छातीचे दोन भाग असतात. हवा आत गेली की एकातून 'फु' असा आवाज येतो व दुसऱ्यातून बाहेर
                गेली की 'फुस' असा आवाज येतो. श्वास घेण्यासाठी व सोडण्यासाठी यांचा उपयोग होतो.


लहानपणी मुले वाटेल तिथे विधिविशेषण  करतात.
प्रत्येकाने विधिविशेषण (धर्म) थोडे तरी पाळावे.

"सोन्यातील कण" मधील 'माधवजी'ची आठवण झालेला विद्यार्थी - माधव ज्युलियन हे गिरणीत मजूर होते व त्यांनी पोलिसांकडून गोळीबार केला…

शकुंतला दुःशासनाच्या  [दुष्यंताच्या] दरबारात….

संयोगिता पृथ्वीराज कपूर याच्या घोड्यावर बसून…

कवीने कल्पनेची नुसती बहार केली आहे. भाषाप्रभुत्व तर आघात आहे. अतिशोक्ती तर शब्दाशब्दात आहे. निसर्गवर्णन खूप सुरत आहे. कवितेत वृत्तांचा आणि अलंकारांचा नुसता खच पडला आहे. अनुस्वारांनी [अनुप्रासांनी] मोठी मजा केली आहे.

गडकऱ्यांचे शिक्षण कमी पण कुणाही शहाण्यास गडकऱ्यांसारखे तारे तोडणे जमणार नाही. आपण जर गोपनीय विचार केला तर गडकरी गगन चुंबे पर्यंत कसे अुड्डाण करतात ते कवितेत दिसेल. त्यांची चमक्-कृतीकारक कविता वाचून कवीबद्दल आधार वाटतो. 

कवितेतील विचार स्फूर्तीदायक आहेत, पण गेयता  तापदायक आहे.

कवयित्री शांता शेळके ह्यांनी 'कविता ही आपली सखी का?' हे एका कवितेत व्यक्त केले आहे. त्यातील एका पंक्तीचा केवळ वाक्यार्थ ध्यानात घेऊन त्या कवितेचे रसग्रहण करणाऱ्या एका विद्यार्थ्याने लिहिले - "शांता शेळकीला एकदा विष खावे लागले, तेंव्हा कवितेने तिला वाचवले म्हणून ती कवितेस प्रिय सखी म्हणते व हीच कवितेची मध्यवर्ती कल्पना होय."

रेल्वे इंजिनाचे आत्मवृत्त
"…. इंजिनची प्रतिभा (प्रतिमा) म्हणते, मी सुदैवाचा मारेकरी [दैवहीन?] असतो तर जमीन फाळणारा किर्लोस्कर [किर्लोस्कर नांगर (?)], स्वबंधावांवर आघात करणारा हातोडा, राष्ट्रमातेचे केस कापणारा न्हावी - म्हणजेच केसरूपी झाडे कापणारी कुऱ्हाड झालो असतो. पण दुर्दैव मला आणि माझ्या आगीच्या भुवयाला भिअून दूर पळून गेले…. "

----xxx ----




 




Comments

  1. हा हा, हाहाहा, ह ह पु वा (हसून हसून पुरेवाट झाली) हा लेख भलत्याच मानेत (भलताच मनात) कोंबला गेला माझ्या!!! :D

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts