स्पर्धा..आणि तीही जीवंत पुतळ्याची!

मनोरंजनासाठी काय काय करता येऊ शकत हे नेदर्लंड्समधल्या (किंवा एकूणच युरोपातल्या) लोकांना विचारा! गेल्या रविवारी मनोरंजनाची एक भन्नाट कल्पना पहायला आणि अनुभवायला मिळाली. पुतळ्याची स्पर्धा..! नेदर्लंड्समधल्या आर्न्हेम गावी दर वर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात येते. आणि हे पुतळे इतर पुतळ्यासारखे नाहीत तर जीवंत पुतळे असतात! जगभरातून (मुख्यत्वे युरोपातून) वेगवेगळे देश ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतात. या वर्षी ह्या स्पर्धेच पाचव वर्ष होत. सर्वोत्कृष्ट पुतळ्याला २००० यूरो च बक्षिस होत. मी आणि माझे मित्र ही स्पर्धा पहायला गेलो. आर्न्हेम स्टेशनच्या बाहेर पडल्यावर सगळीकडे "World Statues Festival 2010, Arnhem" असे बोर्ड्स दिसत होते आणि शहरातली ती मध्यवर्ती जगा जिथे ते प्रदर्शन ऊर्फ स्पर्धा भरली होती तिकडे जाण्यासाठी दिशा देखील दाखवल्या गेल्या होत्या. लोकांचे लोंढे त्याच दिशेने जात होते. साधारण १० मिनिटे चालत गेल्यावर त्या प्रदर्शनाला जमलेल्या गर्दीचा खरा अंदाज आला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच मनोरंजन करेल अशी ही स्पर्धा!
आपल्याइकडे जशी गणपतीसाठी किंवा दहीहंडी साठी वेगवेगळी मंडळ असतात तसे जवळपास १०० वेगवेगळ्या जीवंत पुतळ्याच्या संकल्पना तिथे मांडल्या होत्या. आणि सर्व संकल्पना एकापेक्षा एक! लहान मुलांसाठी देखील एक स्वतन्त्र भाग होता.आता जीवंत पुतळे म्हणजे काय, तर माणसे स्वतःच अंगावर रंगरंगोटी करून किंवा विशिष्ट असे कपडे घालून उभी होती. कुणी इजीप्शीयन देवता, कुणी परी, कुणी एक सुंदरसे जोडपे, कुणी राक्षस असे विविध पुतळे होते. जसजसे आम्ही पुढे पुढे जात होतो तसतसे पुतळे अजूनच मजेशीर वाटत होते. मधूनच थोडावेळ एखाद्या पुतळ्यापाशी आम्ही थांबत होतो. प्रत्येक पुतळ्यासमोर एक वाटी किंवा भांड होत. त्यामधे लोक स्वखुशीन पैसे टाकत होते. भांड्यात पैसे पडल्याचा आवाज आला की पुतळा हलायचा आणि वेगळी "पोझ" घ्यायचा. ती "पोझ" पुन्हा कोणी पैसे टाकेपर्यंत तशीच रहायची.
एक पुतळा एका लहान मुलीचा होता. तिच्या हातात एक बाहुली दाखवण्यात आली होती आणि त्या बाहुलीचा एक पाय तुटला होता. ती बाहुली मुद्दामहून खालती पडत होती. लहान मुले ती उचलून त्या मुलीच्या पुतळ्याच्या हातात बसवायचा प्रयत्न करत होती पण बाहुली हातात बसत नव्हती. कुणी पैसे टाकले की बाहुली हातात बसायची. थोड्यावेळानी पुन्हा ती बाहुली खाली पडायची. लहान मुलांना खूपच मजा येत होती.
असाच अजून एक पुतळा होता. त्यामधे एका प्रवाश्याची संकल्पना दाखवली गेली होती. तो प्रवासी फार घाईत होता. त्याच्या अंगावर एक कोट होता आणि शिवाय पावसासाठी असा एक वेगळा कोट त्या पुतळ्याच्या हातात होता. एक रमची बाटली, एक वर्तमानपत्र असा एकूण वेष होता. दरवेळी या सगळ्यातली एक गोष्ट खाली पडत होती. लहान मुलानी ती उचलून दिली की ती घेताना दुसरी गोष्ट पडायची. ती उचलून देताना मूल दामों जात मग थोडावेळ पुतळा स्तब्ध असे. मोठी मजा..!
आता ह्या सगळ्या पुतळ्यामध्ये महात्मा गांधी नसते तरच नवल! मला वाटत की भारतीयांना सोडून बकिच्यान्नाच गांधीजी जास्त प्रिय आहेत..असो ह्याविषयी जास्त बोलत नाही..माझा ब्लॉग बंद पडायचा...!! पण हे गांधीजी सुधा प्रत्येक जण जो भांड्यात पैसे टाकेल त्याला एका कागदाच्या छोट्याश्या पुंगळीत छापलेला एक "गांधी ऊवाच " संदेश देत होते. हे झाल मोठ्या लोकांच्या विभागातल्या पुतळ्याबद्दल.
लहान मुलांच्या विभागात कोणी बाहुली बनलेल होत तर कुणी बर्ड फीडर; कुणी फोटोग्राफर होत, तर कुणी नेपोलियन. डच लोकांच प्रतिनिधित्व रेम्ब्रांट ह्या चित्रकाराच्या रुपात आणि आन फ्रांक च्या रूपत केल होत. ती आन सुधा गांधीजीं सारखेच पैसे टाकणार्यांना संदेश देत होती. एकूणच मोठी जत्रा जमली होती. सगळ पाहून मजा आली...
तो दिवस खरच खूप मस्त गेला..
शेवटी गांधीजींनी मला दिलेला संदेश तुम्हाला सांगतो-
"Glory lies in the attempt to reach one's goal and not in reaching it."

 पुतळ्याची झलक पहाण्यासाठी क्लिक करा :              
 http://www.facebook.com/album.php?aid=206254&id=730306309&l=c5dced9ad7

Comments

  1. he..khupach Chaan..aplya ethe ashya spardha hone shakya nahi..asle prakar karun bhik magnare lok matra aplyala distat. udaharanarth : hi link paha...
    http://arollingcrone.blogspot.com/2009/01/child-beggars-in-india.html

    ReplyDelete
  2. dhanyawad!! ho na kharach ..baghitli me ti link... sad situation indeed..

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts