आम्स्तरदाम विद्यापीठातला "शैक्षणिक" अनुभव..
शाळा काय किंवा महाविद्यालये काय..ह्या दोन्ही संस्थांमधे काय चालत हयात काही वेगळ सांगण्यासारख नाही.. ज्या गोष्टी आपल्या (भारतातल्या) शिक्षण संस्थांमधे घडतात त्याच इतरत्र घड़ताना दिसतीलही..पण त्याच गोष्टी, दोन्ही ठिकाणी, कश्या पद्धतीनी हाताळल्या जातात हयात विलक्षण फरक जाणवेल... एकूण शिक्षण व्यवस्था कशी असते ह्याबद्दल फार सांगता नाही येणार पण मी जे अनुभवल ते खरोखरच वाखाणण्यासारख आहे.. जे विचार स्वातंत्र्य, ज्या सोयी इथल्या विद्यार्थ्याना मिळतात त्या आपल्या इथे कधी शक्य होणार..हा विचार अस्वस्थ करतो...
पी.एच.डी करायसाठी आम्स्तरदाममधे आलो तेंव्हा मी जे तंत्रद्यान सध्या वापरतो (मास स्पेक्ट्रोमेट्री) त्याबद्दल मला फक्त पुस्तकी ओळख होती... पण इथे आल्यावर काही दिवसातच माझ्या एका प्रोफेसरांनी मला मास स्पेक्ट्रोमेट्रीचा एक कोर्स करण्याबद्दल सुचवल. मीही तयार झालो... त्यांनी स्वतः माझ्यासाठी त्या कोर्ससाठी लागणार पुस्तक विकत घेतल आणि माझ्या हातात सोपवल.. "हा कोर्स झाल्यावर तुला मास स्पेक्ट्रोमेट्रीबद्दल सगळी माहिती होईल" अस ते पुस्तक हातात ठेवताना ते म्हणाले होते... आज मला जरी अजून खूप काही कळत नसल तरी जे द्न्यान घेउन मी इथे आलो होतो त्यापेक्षा नक्कीच जास्त इथे आल्यावर समजल... जसजसे त्या कोर्स चे वर्ग सुरु झाले तसतसे आपण खरच थोड़े मागे पडतो हे लक्षात आल. वास्तविक पहाता हा कोर्स मास्टर्स च्या लेव्हलचा होता..आणि मीही मास्टर्स करूनच इकडे आलो होत..पण तरी काहीतरी कमी वाटत होती....
वर्ग सुरु व्हायच्या आधी साधारण ५-६ दिवस, सगळ्या विद्यार्थ्यांना इ-मेल द्वारे त्या कोर्सच वेळापत्रक देण्यात आल. त्या वेळापत्रका मधे दिवस, वेळ, वर्ग क्रमांक, शिक्षकाचे नाव, त्यादिवशी शिकवला जाणारा भाग, त्यासाठी कोणता धडा किंवा कोणता रिसर्च पेपर वाचावा असे ५-६ रकाने होते...त्यामागचे मूळ कारण हेच की विद्यार्थ्याने तासाला यायच्या आधी त्या दिवशी कोणता भाग शिकवला जाणार असेल त्याबद्दल वाचून यावे... प्रत्येक दिवसाचा तास साधारण घड्याळी ३ तासांचा..पण मधे साधारण १५ मिनिटांची विश्रांती...विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी देखील. वर्गामधे वर-खाली सरकणारे फळे, वर्गाच्या मधोमध छतावारून खाली आलेला एक प्रोजेक्टर, फळ्यामागच्या भिंती वर प्रोजेक्टर फोकस्ड असणार.. प्रोफ़ेसर जो भाग शिकवणार असतील त्याबद्दल एक प्रेझेंटेशन (स्लाइड शो) बनवून आणणार..आणि त्याद्वारे शिकवणार..त्या प्रेझेंटेशनची एक छापील प्रत प्रत्येक विद्यार्थ्याला दिली जाणार..आणि त्याच बरोबर त्यादिवशी जर कुठले एक्जरसाइजेस घेणार असतील तर त्याच्याही प्रति..ह्या सगळ्याशिवाय प्रत्येक भागासाठी लागणारे आणखी काही रिसर्च पेपर आणि इतर उपयोगी गोष्टी "black board" वर सर्वांना मिळणार.. Black board म्हणजे इन्टरनेटवर प्रत्येक विद्यार्थ्याला वापरता येइल अस एक अकाउंट असत. प्रत्येक विद्यार्थ्याचा user name आणि password असतो. शिक्षक शिकवत असताना कोणालाही प्रश्न विचारायची सवलत.. विद्यार्थ्यांची संख्या साधारण १५-२० आणि वयाची कुठलीही मर्यादा नाही..माझ्या बरोबर एक केमिस्ट्रीचे शिक्षक मास स्पेक्ट्रोमेट्रीबद्दल जाणून घ्यायला तासाला यायचे.. आणि विद्यार्थ्यात बसायचे...मधल्या विश्रांती मधे प्रोफ़ेसर काय किंवा विद्यार्थी काय कॉफी कधी विसरणार नाहीत...वर्गाच्या बाहेर, जवळच कॉफी किंवा ज्यूस किंवा शीतपेय आणि खाण्यासाठी (बर्गर तत्सम..) एक छोट ऑटोमाटिक कपाट..त्यात पैसे टाकून जे हव ते घेता येणार.मिळेल त्या वेळात शिक्षकांना भेटून आपली शंकांच निरसन करून घ्यायला मुभा...ह्या सगळ्यातून "बरोबर" concepts पक्क्या लक्षात रहायला मदत होते...कोर्स च्या शेवटी २-३ दिवसांची सुट्टी आणि लगेच परीक्षा..आणि परीक्षेचा निकाल देखील साधारण २-३ आठवडयात लागणार!!
असाच अजून एक कोर्स करण्याचा योग आला..तोही असाच होता..त्यामधे एक छोटा बदल होता..विद्यार्थ्यांमधे आपसात २ किंवा ३ जणांचे असे ६ गट पाडले होते. कोर्स चालू असताना विषयाशी निगडित अशी ६ assignments दिली होती. प्रत्येक गटाने सगळी assignments पूर्ण करायची होती आणि शेवटी प्रत्येक गटाने एका assignment वर प्रेझेंटेशन (स्लाइड शो) द्यायच होत आणि त्यावर त्यांना विद्यार्थी आणि शिक्षक प्रश्न विचारू शकणार होते. प्रत्येक assignment मधे एक प्रश्न विचारला होता आणि त्याच उत्तर एखाद रिसर्च प्रोपोसल लिहिल्या सारख असाव अशी शिक्षकांची अपेक्षा होती.. त्यासाठी लागेल ती मदत करायला शिक्षक तयार होते..हवे तेवढे रिसर्च पपेर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध होते..ज्या दिवशी ते assignment वर्गात सांगीतल जाईल त्या दिवशी दुपारी थोडा वेळ त्या assignment बद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांमधे प्रश्नोत्तरे किंवा चर्चा व्हायची...त्या आधी विद्यार्थ्यानी शिक्षकांनी सुचवलेले काही रिसर्च पपेर्स वाचण अपेक्षित होत...शिकवताना देखील रिसर्च पेपर मधली काही उदाहरणे घेउन शिकवण्याचा प्रयत्न केला गेला...अश्या सर्वातून हेतू एकच की..विद्यार्थ्यांनी काहीही करून "विचार" करायला सुरवात करावी...एकदा वर्गात एका रिसर्च पेपर मधल उदहारण घेउन शिकवताना विचारलेल्या प्रश्नाच उत्तर प्रश्न संपताच एका मुलानी दिलं होतं...मी चाट झालो होतो...
आता मागे बघितल तर काही वेळा वाटत की इथले विद्यार्थी चपळ आणि वेगवान आहेत कारण ते आपल्यापेक्षा जास्त वेगाने विचार करू शकतात.. शिक्षकांची तळमळ भारतामधे सुधा आहे..मग फरक कोणता...
१) विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी,
२) विचार स्वातंत्र्य,
३) सर्वात महत्वाच..विद्यार्थ्यांची विचार करण्याची सवय..जी भारतामधे नक्कीच कमी आहे.
जेंव्हा भारतातले विद्यार्थी अजून जास्त विचार करायला लागतील तेंव्हाच त्यांची खरी प्रगती होईल अस मला इथे आल्यावर जरा जास्तच वाटू लागल आहे..आणि त्यासाठी नक्कीच भारतातले शिक्षक तयार असतील..ह्यात शंकाच नाही...
wishwas tu khrach mast lihitos... atishay uttam lihil ahes..
ReplyDeleteAnuja..hi comment tujhi ahe he kaleparyant khup wel lagla..nav badal.. :) aso dhanyawad!!
ReplyDeletetu pan lihayla surwat karte ahes ka? jaroor kar..shubhechcha!! Aai la ( mhanje majhyasathi Baai na) dakhav hava tar shalet wachun dakhwawasa watla tari chelel..he promotion sathi nahi sangate pan asach kharach awadla ani watla tar... looking forward to your writing...